

From the Publisher Swami Vivekananda : स्वामी विवेकानंद पुस्तक : जीवन, विचार आणि कार्य हिंदू धर्माची थोरवी जगभर समजावून सांगणारे आणि विश्वधर्म संमेलनात विश्वबंधुत्वाची भूमिका मांडणारे थोर विचारवंत म्हणजे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांना हिंदू धर्माइतकीच किंवा त्याहून काकणभर अधिक भारताच्या विकासाची तळमळ होती. त्यांना नवा भारत घडवायचा होता म्हणून त्यांनी भारतभ्रमण केले. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत फिरताना त्यांनी सामान्य माणसातील स्वाभिमान आणि 'स्व' जागृत करण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे लोण देशभर पसरले; कारण त्यासाठी अनुकूल मनोभूमी विवेकानंदांच्या विचारांनी आधीच तयार करून ठेवली होती. स्वामीजींना सामान्य माणसांविषयी तळमळ होती. सामान्य माणूस हाच त्यांच्या धर्म आणि विकास या संकल्पनेच्या केंद्रस्थानी होता. तरुणांना ते संदेश देतात, 'माझ्या तरुण मित्रांनो, शक्तिशाली व्हा, ठाम निश्चयाचे, तेजस्वी असे शंभर युवक जग हादरवून टाकू शकतात.' गुरुदेव रवींद्रनाथ टागोर विवेकानंदांचे महत्त्व सांगताना म्हणतात, 'तुम्हाला भारत माहीत करून घ्यायचा असेल तर विवेकानंद वाचा. सर्व विवेकानंद सकारात्मक आहेत, त्यांच्यात नकारात्मक असे काहीही नाही.' जगण्याला आणि जीवनाला दिशा देणारे त्यांचे विचार स्फूर्तिदायक, प्रेरणादायक आहेत. निःस्वार्थ सेवा, शब्दांचे माहात्म्य, ईश्वरावर श्रद्धा, निर्भीड आणि दयाशील वृत्ती, आत्मत्याग आणि आत्मविश्वास, कर्तव्य, प्रेम, भक्ती आणि विश्वबंधुत्व इत्यादी महत्त्वपूर्ण घटक यात येतात. जीवनाच्या अनेकविध टप्प्यांवर योग्य-अयोग्यतेची जाण देऊन प्रेरणा, चैतन्य, उत्साह व यशाकडे नेण्यासाठी या पुस्तकाची मोलाची मदत होईल. हे जाणून घेण्यासाठी प्रस्तुत पुस्तक वाचायलाच हवे! ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- आदर्श अनेक आहेत. तुमचा आदर्श कोणता असावा हे सांगण्याचा किंवा एखादा आदर्श तुमच्या गळी उतरविण्याचा मला कोणताच अधिकार नाही. तुमच्यासमोर विविध आदर्श ठेवणे इतकेच माझे कर्तव्य आहे. तुमच्या स्वभावानुसार जो तुम्हाला अधिक अनुकूल वाटेल तोच तुम्ही स्वीकारा आणि त्याच दिशेने अविरत प्रयत्न करा. तेच तुमच्यासाठी‘योग्य’ आहे. तोच तुमचा विशेष आदर्श आहे. प्रत्येक मनुष्याचे हे कर्तव्य आहे की, त्याने त्याचे आदर्श घेऊन त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. जे तो कधीच पूर्ण करू शकणार नाही, असे दुसर्याचे आदर्श घेऊन चालण्यापेक्षा आपल्याच आदर्शाचे अनुसरण करणे हाच यशस्वी होण्याचा अधिक चांगला मार्ग आहे. उदाहरणार्थ आपण जर एखाद्या लहान मुलाला एकदम 20 कि.मी. चालायला सांगितले, तर तो बिचारा मरूनच जाईल आणि समजा हजारात एखादा रांगत रांगत तिथपर्यंत पोहोचलाच तर तोही तोपर्यंत अर्धमेला होईल. कोणत्याच समाजातील सर्व स्त्री- पुरुष एकसारख्या मनाचे, एकसारख्या योग्यतेचे व एकसारख्या शक्तीचे नसतात. म्हणून त्यातील एकाचीही अवहेलना करण्याचा आपल्याला अधिकार नाही. आपल्या आदर्शांना मिळविण्यासाठी प्रत्येकाला पाहिजे तेवढे प्रयत्न करू द्या. पुन्हा तुम्हाला माझ्या व मला तुमच्या आदर्शांनी तपासणे, हेही योग्य नाही. सफरचंदाची ओकच्या झाडाशी व ओकची सफरचंदाच्या झाडाशी तुलना करू नये. सफरचंदाच्या झाडाचा विचार करताना त्याला त्याचेच माप घ्यावे लागेल आणि ओकसाठी ओकचेच माप वापरावे लागेल. आपण आपल्या आदर्शांना कधीच विसरू नये. आदर्श पुरुष तर ते आहेत जे परमशांती व नि:स्तब्धतेमध्येही तीक्र कामाचा तसेच प्रबळ कर्मशीलतेमध्येही वाळवंटातील शांती व नि:स्तब्धतेचा अनुभव घेतात. - स्वामी विवेकानंद 11 सप्टेंबर 1893 चा दिवस सर्व भारतीयांसाठी ऐतिहासिक दिवस समजला जाईल. या दिवशी स्वामी विवेकानंद यांनी जगातील सर्वोच्च स्थानी हिंदू धर्माचा झेंडा फडकविला. सकाळी दहा वाजता संमेलनाला सुरुवात झाली. या संमेलनात ख्रिश्चन, हिंदू, जैन, बौद्ध, कन्फ्युशियन, इस्लाम, शिंतो आणि पारशी या धर्मांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला आणि आपले विचार मांडले. एकेक प्रतिनिधी उठून व्यासपीठावर येत होता आणि लिहून आणलेले भाषण वाचून दाखवीत होता. स्वामी विवेकानंद तर कोणतीही तयारी न करता संमेलनाला आले होते. इतक्या मोठ्या संख्येने जमलेल्या गर्दीसमोर व्याख्यान देण्याचा हा त्यांचा हा पहिलाच प्रसंग होता. त्यामुळे त्यांच्या हृदयाची स्पंदने वाढली होती. अनेक वेळा बोलावल्यानंतरही त्यांनी आपली पाळी रद्द करून, दुसर्यांना पुढे पाठविले. शेवटी ते उठले. मनातल्या मनात देवी सरस्वतीला वंदन करून ते म्हणाले, ‘‘अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो’’ त्यांनी असे शब्द उच्चारताच हजारो श्रोते आपल्या खुर्चीत उठून उभे राहिले आणि त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटाने त्यांचे स्वागत केले. औपचारिक शब्दांऐवजी काळजाला भिडणार्या अशा प्रकारच्या शब्दांचा वापर करणारे ते एकमेव वक्ते होते. श्रोत्यांत निर्माण झालेला हा उत्साह शांत होण्यास दोन मिनिटे लागली. त्यानंतर इतर सर्व धर्मांसंबंधी हिंदू धर्मात कशाप्रकारे सहिष्णुता बाळगली जाते, यावर त्यांनी थोडक्यात विवेचन केले आणि नंतर ते आपल्या जागेवर जाऊन बसले. त्यांच्या अतिशय छोट्या; पण खूप प्रभावी झालेल्या भाषणाची दुसर्या दिवशी स्थानिक वर्तमानपत्रांनी खूप प्रशंसा केली. हे संमेलन सतरा दिवस चालले. या संमेलनात रोजच स्वामीजी सर्वांच्या शेवटी व्याख्यान देत असत. त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत श्रोते आपापल्या खुर्चीला चिकटून बसत असत. वृत्तपत्रात त्यांच्याच व्याख्यानाच्या बातम्या जास्त प्रमाणात असत. शिकागोच्या रस्त्यावर त्यांच्या उभ्या आकारातील प्रतिमा लावण्यात आल्या होत्या. लोक त्यांना श्रद्धापूर्वक नमस्कार करून पुढे जात असत. धर्मसंमेलनाच्या शेवटच्या दिवशी 27 सप्टेंबरला उपसंहार करताना स्वामीजी म्हणाले, ‘‘ख्रिश्चन असलेल्यांनी हिंदू किंवा बौद्ध होण्याची गरज नाही; तसेच बौद्ध अथवा हिंदूंनी ख्रिश्चन होण्याची आवश्यकता नाही. अर्थात, दुसर्याच्या धर्माचे सार मात्र प्रत्येकाने समजून घेतले पाहिेजे. त्याचा उपयोग करून आपले जीवन जास्तीत जास्त समृद्ध केले पाहिजे. या विश्वधर्म संमेलनाने जगासमोर काही मांडले असेल, तर ते हे आहे : या संमेलनाने हे सिद्ध केले आहे की, शुद्धता, पवित्रता आणि दयाशीलता या गोष्टी कोणत्याही एका संप्रदायाच्या मालकीच्या नाहीत. प्रत्येक धर्माने श्रेष्ठ आणि थोर स्त्री-पुरुषांना जन्माला घातले आहे. इतके सारे पुरावे सादर केल्यानंतरही कुणाला असे वाटत असेल की, बाकी सारे धर्म बुडावेत आणि केवळ माझाच धर्म राहावा, तर मला त्याची कीव येते. मी त्याला हे या ठिकाणी स्पष्ट शब्दांत सांगू इच्छितो की, लवकरच सर्व धर्मांच्या झेंड्यांवर‘युद्ध नको, मदत हवी,’ ‘विनाश नको, निर्मिती हवी’, ‘मतभेद आणि कलह नको, तर एकोपा आणि शांतता हवी’ या गोष्टी लिहिलेल्या आढळतील.’’ विवेकानंदांच्या या शब्दांचा खूपच परिणाम झाला. त्यांनी वेदांतील सार्वभौमिक विचारांचा प्रसार केला होता. त्याचा परिणाम म्हणूनच आर्य जाती, आर्य धर्म आणि आर्य भूमी या जगाच्या दृष्टीने पवित्र आणि पूजनीय ठरली होती. हिंदू लोक गरीब आहेत; पण तिरस्कृत नाहीत. दीन, दु:खी असूनही ते बहुमूल्य पारमार्थिक संपत्तीचे अधिकारी आहेत. धार्मिक क्षेत्रात जगत्गुरू होण्याच्या योग्यतेचे आहेत. अनेक शतकांनंतर विवेकानंदांनी हिंदू धर्माची महानता आणि वैशिष्ट्ये जगासमोर आणली. तिरस्कार आणि अपमानाच्या चिखलात रुतलेल्या हिंदू धर्माला त्यांनी वर काढून विश्वधर्म संमेलनात मानाचे स्थान मिळवून दिले. - प्रस्तुत पुस्तकातून Review: Buy if you - Best biography of Swami Vivekanand who gives message to Rise , Awake and stop not till the goal reached.. Review: Very Informative and very helpful - This is very interesting and informative book. I am becoming more curious about Spiritual Legend Swami Vivekanand. Must read this book.

| Best Sellers Rank | #8,906 in Books ( See Top 100 in Books ) #299 in Biographies & Autobiographies (Books) |
| Customer Reviews | 4.3 out of 5 stars 538 Reviews |
A**R
Buy if you
Best biography of Swami Vivekanand who gives message to Rise , Awake and stop not till the goal reached..
S**N
Very Informative and very helpful
This is very interesting and informative book. I am becoming more curious about Spiritual Legend Swami Vivekanand. Must read this book.
S**T
Swamiji
Very nice
�**�
Good book
Khup Chan Pustak ahe...Swami Vivekananda che balpanapasunche te purn jeevan pravasche varan akdam thodkyat ,sadya Ani sopya bhashet kele ahe..Swami Vivekananda thodkyat samjun ghenyasthi best book.
S**I
Hindu dharmala dusrya Deshat pohchvnyach kam swami vivekanandani khup sundartene par padal
Khup chan👌
A**.
Good
Good
K**E
Bb
This is a good novel l like it very much much,it inspire me very much l was very waiting to read this book
P**E
Must try
Nice 👍
Trustpilot
2 months ago
1 week ago